- श्री कृष्णा बुवा यांच्याबद्दल “कृतज्ञता” ग्रंथा मधील माहिती
- श्री कृष्णा बुवा यांच्याबद्दल श्री. बाळासाहेब शां. नाडकर्णी, कोल्हापूर यांनी लिहलेला लेख
त्याकाळी एकदा संध्याकाळी मिरज-पंढरपूर रेल्वे शेवटची गाडी गेल्यानंतर स्व. रामचंद्र जाधव रेल्वे चाळीतील आपल्या क्वार्टर्स परतत होते. त्यावेळी त्यांना एक संन्याशी रेल्वे प्लॅटफॉर्मच्या एका टोकावर असलेल्या बाकड्यावर बसलेला दिसला. रामचंद्र जाधवांनी त्यांची चौकशी केली तर त्यांनी पंढरपूरला जाण्याची रेल्वे चुकली असलेने ते तेथे बसले होते. संन्याशी मराठी बोलत होते आणि तब्येत सश३त अशी होती. भारतात संन्यस्त धर्माला प्राचीनकाळापासून मान-सन्मान प्राप्त झालेला आहे. त्यांना समाजाचा मानही मिळत आला आहे. परमेश्वराशी ऐ३य साधणे हे त्यांचे ध्येय असते. गुरुंच्या आज्ञा पालनात ते असतात. या भावूक भावनेने रामचंद्र जाधवांनी त्यांना आपल्या रेल्वे चाळीतील घरी येण्याचा आग्रह केला आणि ते या संन्याशी सत्पुरुषाने मान्य केले. त्यांचे नांव होते कृष्णबुवा.
ते कोल्हापूरच्या श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचे अंतरंगातील शिष्य होते. त्यांच्या गुरुदेवांनी त्यांना श्रीक्षेत्र पंढरपूरला शुध्द एकादशीला प्रत्येक महिन्याची वारी करण्यास सांगितले होते. नंतरच्या काळात कृष्णाबुवा पंढरपूरला येता-जाता जाधव, पांढरे-पाटील-तुपारे यांच्याकडे येऊ-जाऊ लागले. स्नेह जुळत गेला. कृष्णाबुवांच्या बोलण्यातून त्यांच्या गुरुदेवांच्या भव्य दिव्य जीवनाचा उलगडा या परिवाराला होऊ लागला. गुरुशिष्याबद्दलचा चिरंतन संबंधाचा अध्याय सुरु झाला. त्यांच्या गुरुदेवाचे नांव श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज असले तरी त्यांचे वास्तव्य कुंभार गल्लीतील मातृवत्सल, अपूर्व शांती लाभलेल्या संत महिला पुण्यश्लोक ताराबाई शिर्के यांच्या घरी होते.

कृष्णाबुवांचे आडनाव निकम होते. सांसारीक जबाबदारीच्या जगात उतरल्यानंतर त्यांना अपास्माराची बाधा (फेफरे) झाली. ते शाहू महाराजांच्या दरबारात घोडेस्वार या पदावर नोकरी होते. घरी आई-पत्नी, संसार सुखाचा होता. परंतु त्यांना अपस्माराची (फेफरे) पिडा होती, औषधपाणी केले परंतू कांही फरक पडला नाही. अशा वेळी त्यांच्या एका मित्राने कुंभार गल्लीतील दत्ताला जा, ते तुला बरे करतील, मरणातून सोडवतील असे सांगितले. त्याप्रमाणे एके दिवशी ते कुंभार गल्लीत दत्ताला दर्शनासाठी गेले. त्यांना पाहताच महाराज म्हणाले, ‘‘भस्म लाव, राख लाव’’ प्रश्न न टाकताच महाराजांनी दिलेले उत्तर ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. ते रोज कुंभार स्वामींच्या दर्शनाला जाऊ लागले. कुंभार स्वामी कृष्णाबुवांविषयी भ३त मंडळींना म्हणत ‘‘हे उत्तम आहे घोडे, कुलवान घोडे आहे.’’ कृष्णाबुवांना आश्चर्य वाटे. त्यांचे आजोबा (आईचे वडील) हे राजदरबारात नोकरीस होते. ते माळकरी होते. त्यांची पंढरपूर वारी होती. एकदा ते पंढरपूरला आषाढी वारी दर्शनाला गेले असतांना त्यांना कोल्हापूरला कामावर हजर व्हायला कांही दिवसाचा उशीर झाला. कोल्हापूरहून परत आल्यानंतर ते पुन्हा कामावर गेले. वरिष्ठांना व आपल्या सहकाऱ्यांना भेटून पंढरपूरहून येण्यास उशीर झाला. त्यामुळे नोकरीवर हजर होण्यास दोन-चार दिवस उशीर झाला असे सांगितले. त्यांचे सहकारी व वरिष्ठ बुचकळ्यात पडले. तुम्ही वेळेतच कामावर हजर झाला असून, हजेरी पुस्तकात तशी नोंद आहे, असे सांगून हजेरी पुस्तक दाखवले. त्यांच्या आजोबांचे डोळे भरुन आले. आपल्यासाठी विठ्ठल देव राजदरबारात आपले रुप घेऊन आले आणि त्यांना काम करावे लागले याचे वाईट वाटले. पांडुरंगाला-विठ्ठलाला आपल्यासाठी श्रमविले असे वाटून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. अशा थोर माळकरी घराण्याचा वारसा कृष्णाबुवांना लाभला होता. त्यांना कुंभार स्वामी म्हणत की, ‘‘पंढरपूरची वारी का करीत नाहीस?’’ एकदा त्यांना पंढरपूरला जायचे होते. त्यांनी कुंभारस्वामींना परवानगी मागितली. कुंभारस्वामींनी त्यांना पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याची संमती दिली. कृष्णाबुवांनी पंढरपूरला जाण्याची तयारी केली. वाटखर्चासाठी पाच रुपये जमविले. उद्या जाणार इत३यात त्यांच्या आईनं अंगावरले लुगडे जुने झाले आहे, लुगडे आण, असे सांगितले, यावर कृष्णाबुवांना कांही सुचेना. प्रथम पंढरपूर करावे की, आईला लुगडे आणावे. जवळ तर फ३त पाचच रुपये होते आणि या दोन्हीपैकी एकच कार्य ते करु शकत होते. ही सत्याची कसोटी होती. बुध्दीपयरत पोहचता येत नव्हते. एखाद्या माणसाची यो१⁄२यता आजमावण्यासाठी संत पुरुष कसोटी लावतात. अशा प्रसंगी कृष्णाबुवा अंतरंगी शांत राहिले. त्यांनी पाच रुपयाचे लुगडे आईला आणून दिले.
दुसऱ्या दिवशी कृष्णाबुवा कुंभार स्वामींच्या दर्शनाला गेले असता मेघगर्जनेहून सामर्थ्यवान पण फुलाहनू कोमल मृदू आवाजत कुंभार स्वामी त्यांना म्हणाल, ‘‘बरे केलेस पोरा’’ आसामंतातील व्यापक दिव्यदृष्टीने स्वामींनी बुवांनी आईला लुगडे आणून दिल्याचे ओळखले. ते पाहून कृष्णाबुवांचे डोळे भरुन आले. त्याच रात्री त्यांचा एक मित्र त्यांच्या घरी आला व तो म्हणू लागला ‘‘आम्ही सहकुटूंब पंढरपूरला दर्शनाला उद्या निघणार आहोत. आमच्या जाण्याची व्यवस्था झाली आहे. सोबतीला तू चल तुझ्यासाठी घोडे तयार आहे.’’ अशा रितीने जरी पाच रुपये आईच्या लुगड्याला खर्च झाले असले, परिस्थिती दारिद२्रयाची असली तरी त्यांच्या गुरुदेवांनी कुंभार स्वामींनी त्यांची पंढरपूरला जाण्याची सोय करुन ठेवली होती. मित्राची विनवणी ऐकून कृष्णाबुवांना परमानंद झाला. ते मित्राबरोबर पंढरपूरला गेले.
श्री क्षेत्र पंढरपूरला खूप गर्दी झाली होती. या गर्दीत त्यांना दर्शन होणे कठीण वाटले. त्यात अपस्मारीचा त्रास. काय करावे हेच कळेना. इत३यात मंदिरातील पुजारी /बडवे आला तो त्यांना म्हणाला, ‘‘चला बुवा पांडुरंगाच्या दर्शनाला’’ असे म्हणून त्या पुजाऱ्याने /बडव्याने त्यांना दर्शनासाठी मंदिरात नेले. मंदिरात त्यांना त्या महागर्दीतून पांडुरंगाऐवजी गुरुदेव कुंभार स्वामीच दिसू लागले. अशी दिव्य अनुभूती त्यांना येत होती. कृष्णाबुवा मला पांडुरंगाचे दर्शन घडवा, असे पुजारींना / बडव्याना म्हणत होते. ते देहभान विसरुन गेले होते. तर पुजारी / बडवे व लोक कृष्णाबुवांना म्हणत होते तुला डोळे नाहीत काय? आंधळा आहेस काय? समोरच पांडुरंग उभा आहे. मग कृष्णाबुवांना विराट स्वरुपात पांडुरंगाचे दर्शन झाले. कृष्णाबुवांची खात्री झाली. आपले गुरुदेव कुंभारस्वामी व पंढरपूरचा पांडुरंग एकच आहेत.
कुंभारस्वामी कृष्णाबुवांना वरचेवर म्हणत ‘‘तू अंगाला राख लाव.’’ एकदा भ३तांसह श्री क्षेत्र वाडी रत्नागिरीला जोतिबाच्या दर्शनाला जात असतांना कृष्णाबुवा खानदानी घराण्यातील, माळकरी घराण्यातील विठ्ठल कृपापात्र घराण्यातील म्हणून त्यांना म्हणाले, ‘‘कुलवान घोडे’’ व त्यांच्या खांद्यावर बसले. परमेश्वरी इच्छा गोंधळून टाकत असते. लवकरच त्यांचे कुटुंब निवर्तले. एकुलत्या एका मुलीचे ल३⁄४ होऊन ती अर्जुनवाडला, ता. शिरोळ येथे सासरी गेली. आपल्या गुरुदेवांच्या आज्ञेने त्यांनी अंगाला राख लावली व ते संन्यास घेऊन अलाहाबादच्या कुंभमेळ्याला निघून गेले. ते नागासाधूंच्या झुंडीत सामील झाले.
भारतात फार पुरातन काळापासून कुंभमेळे भरतात. दर सहा वषारनी भरणाऱ्या यात्रेला अर्ध कुंभमेळा म्हणतात. तर दर बारा वषारनी भरणाऱ्या धार्मिक यात्रेला हिंदू लोक कुंभमेळा म्हणतात. भारतातील हजारो साधू फ३त कुंभमेळ्यांच्या पुण्यपर्वाला झुंडीने – गटाने बाहेर पडतात. त्यांचे दर्शन संसारातील लाखो स्त्री-पुरुष घेतात. कृष्णाबुवा बारा वर्षे नागा साधूंच्या सहवासात राहिले. नागासाधूंचे मुख्य लक्षण म्हणजे हे दिगंबर अवस्थेत असतात. अंगभर भस्म चर्चन करतात. जटादाढी हे त्यांचे बाह्यस्वरुप असते.
कृष्णाबुवांच्या गुरुदेवांनी कुंभारस्वामींनी श्रावण वद्य दशमी शके १८२२ सोमवार दि. २०/८/१९०० रोजी श्रीक्षेत्र कोल्हापूरला अवतार समाप्ती केली. गुरुदेवांच्या आज्ञेने ते पंढरपूरची वारी शुध्द एकादशीला करीत, बारा वर्षाच्या पंढरपूर वारीनंतर विठ्ठलाचे – पांडुरंगाचे त्यांना दर्शन झाले होते. त्यांना ईश्वर म्हणजे सच्चिदानंद प्राप्त झाला होता. त्या आनंदाचा कधीही अंत होणार नव्हता. चंद्रभागेत त्यांनी श्रीविठ्ठलाला – पांडुरंगाला स्नान घातले होते. पांडुरंगाने त्यांना स्नान घातले होते. आज रेल्वे चुकल्याने त्यांच्या गुरुदेवांच्या भविष्यातील संकेतानुसार रामचंद्र जाधवांच्या घरी कृष्णाबुवा आले होते. रामचंद्र जाधव, यल्लाप्पा तुपारे, पाटोळे, पांढरे-पाटील यांचा भा१⁄२योदय झाला होता.
हिमालयात कितीतरी साधु, संन्याशी, बैरागी, योगी, गोसावी राहतात. गिरीजन राहतात. पण या साऱ्यानाच ईश्वरप्राप्ती होते असे नाही. परंतु कृष्णाबुवांच्यामुळे या संसारी लोकांना ईश्वर प्राप्त झाला होता. श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज, कुंभारस्वामी प्राप्त झाले होते. श्रीक्षेत्र पंढरपूरला जाताना – येताना कृष्णाबुवा रामचंद्र जाधवांच्या घरी येऊ- जाऊ लागले. मु ̧ामही करु लागले. सन १९४२ मध्ये आपल्या गुरुदेवांच्या कुंभार स्वामींच्या चर्मपादुका, टोप्या (हिरव्या रंगाच्या), रुद्राक्षमणी रामचंद्र जाधवांना कृष्णबुवांनी दिल्या. सन १९४५ मध्ये मिरजेतील नदीवेस पवार गल्लीतील एका अरुंद गल्लीत रामचंद्र जाधवांनी एक छोटेखानी घर घेतले. या घरात कृष्णाबुवांच्या हस्ते श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या तसबिरीची स्थापना होऊन नैतिक अध्यात्मिक मुल्यांच्या जोपासनेचे एक कार्य चालू झाले. आयुष्याचे ध्येय आणि आयुष्याचा मार्ग दाखवण्याचे हे कार्य होते.
भुईगल्ली-पवार गल्लीत एक पुराणप्रसिध्द श्री विठ्ठल मंदिर असून ते जागृत स्थान आहे. कृष्णाबुवा त्यांच्या गुरुदेवांच्या आज्ञेने शेवटी कृष्णा नदीकाठी वास करुन राहिले. मिरजेत ते भुईगल्ली-पवार गल्लीतील विठ्ठल मंदिरात राहत. दोन प्रहरी ते पांढरेंच्या घरी भिक्षेला जात तर रात्री जाधवांच्या घरी भिक्षेला जात. वसतिस्थान मात्र विठ्ठल मंदिर होते. कधी कधी ते अर्जुनवाडला जात, तेथे त्यांचा मु ̧ाम सदाशिव महाराजांच्या मठात असे. ते स्नानाला नदीकाठी येत. जेथे ते स्नान करीत त्या जागेला बुवांचा पाणवठा असे नांव पडले. तेथे एक छोटे मंदिर आहे. त्यांच्या डो३यावरच्या जटा दहा ते बारा फूट लांब होत्या. एकदा शिर्केच्या गुरुदेवांच्या समाधी मंदिरातील एका घुशीला कृष्णाबुवाने जटेच्या माराने मृतप्राय केले होते. कृष्णाबुवांनी श्री विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठलासमोरील पिंपळ वृक्षाखाली पारावर दि. ६/११/ १९४७ रोजी अवतार समाप्ती केली. त्यांच्या जाधव – पांढरे – पाटील रजपूत या शिष्यांनी त्यांना कृष्णा नदीकाठी समाधी दिली. जणू एक पर्व संपले.
संदर्भ ग्रंथाचे नांव :- कृतज्ञता
लेखकाचे नांव :- श्री. बजरंग झेंडे
श्री कृष्णा बुवा यांच्याबद्दल श्री. बाळासाहेब शां. नाडकर्णी, कोल्हापूर यांनी लिहलेला लेखसदगुरुंचे वारु श्री कृष्णास्वार
सदगुरुंचे वारु श्री कृष्णास्वार श्रीपती तुम्ही उभे राहूनी युगा श्रमला ।
कृष्ण सरस्वती रुप घेऊनी सिंहासनी बसला ॥धृ॥
सद२गुरु सांगती कृष्णा स्वार जावे तू पंढरीला ।
रमा माधवा पाहुनी यावे ही आज्ञा तुजला ।
स्वयं गुरु तुम्ही विठ्ठल मग वदे यातायात कशाला ॥१॥
ती आज्ञा मानून प्रवासा किंचित धन जमवले ।
गुजराया नव्हते मातेस्तव नववस्त्रा ते खर्चले ।
रुखरुख ती नाशली गुरुकृपे अश्वलाभ जाहला ॥२॥
महिमा गात गुरुंचा आला दास स्वार पंढरीला ।
हा तर आमुचा श्री गुरु म्हणे मग कुठे विठ्ठल सावळा ?।
राऊळी रुपी श्री रुपांतर झाले चमत्कार पाहिला ॥३॥
जग जेठी तो जानकीजीवन द्वारकाधीश झाला ।
कीर्ती वाढवित द्वैत निपटीत मारुती दत्त झाला ।
जय जयकार करीत गुरुंचा स्वार दास ये मठीला ।
यत्किचिंत त्यास त्रास न झाला गातो सीतासुत गुरुलीला ।
श्री कृष्णा स्वारांचे आडनाव निकम असे होते. ते स्वत:च्या खांद्यावर श्रीकृष्ण सरस्वती महाराजांना बसवून ने आण करीत. तीच त्यांची गुरुसेवा होती, आणि म्हणूनच महाराज त्यांना स्वार म्हणून संबोधित असत. ‘‘स्वारांना बोलवा’’ ‘‘स्वार कुठे आहेत?’’ असा उल्लेख महाराजांच्या बोलण्यात वारंवार येत असे. लांब अंतरावर जाण्याच्या महाराजाच्या प्रत्येक प्रवासात श्री कृष्णास्वार होतेच.
श्री कृष्णा स्वार हे कोल्हापूर येथीलच. शिवाजी पेठेमध्ये त्यांचे घर होते. बालपणापासूनच ते सश३त होते व तरुणपणात व्यायाम करुन त्यांनी अधिक देह प्रकृती कमावली होती. छत्रपतींच्या पदरी रिसाल्यात म्हणजे घोडदळात नोकरीला होते. त्यांना अपस्मारी (फेफरे) वारंवार त्रास देत असे. गृही त्यांच्या एक वृध्द माता व स्वरुपवान पत्नीसह दोन अपत्ये होती. मोठी एक मलुगी व लहान एक मलुगा. हा लहान मलुगा अगदी अंगावरचा असतांना तो सारखा रडत असे. औषधोपचार करुन सुध्दा ह्या मुलाचे रडणे थांबेना. त्यावेळी अशी लहान मुले रडावयास लागली की माता त्या मुलांना थोडी अफू देत. मग त्या गुंगीने मूल झोपी जाई. त्याप्रमाणे कृष्णा स्वारांच्या पत्नीने स्वत:च्या ह्या रडणाऱ्या मुलाला अफू घातली. पण ती नेहमीच्या प्रमाणा पेक्षा जास्त झाल्यामुळे झोपेतच ते मूल दगावले. एकुलता एक मुलगा आणि वंशाचा दिवा अशा प्रारब्धाच्या फट३यात मृत्यूमुखी पडला.
त्या मुलाची उत्तरक्रिया करण्यात आली. तेंव्हा सवारना समजले अफूने मूल दगावले. पुत्र वियोगाचा प्रहर बसलेल्या कृष्णा स्वारांच्या त्या पत्नीला पती क्रोधाची जबरदस्त भीती वाटली. आपल्या लहान मुलीस घेऊन तिने माहेरचा रस्ता धरला. जी ती माहेरी गेली ती परत सासरी आलीच नाही. केवढा वचक तिने ह्या कृष्णा स्वारांच्या घेतला होता, हे ह्या वरुन दिसून येईल. छत्रपतींची नोकरी करुन कृष्णा स्वार घरी वृध्द मातेसह रहात असत. परत त्यांत अपस्मारी त्रास ज्यामुळे त्यांचे मन विषण्णावस्थेत गेले. अशा स्थितीत त्यांनी मग वैरा१⁄२य मठीत येऊन श्रीकृष्ण सरस्वती महाराजांच्या चरणावर लोटांगण घातले. तेंव्हा महाराज त्यांना म्हणाले ‘‘बुवा आता तुम्ही अंगावर भगवे घ्यावे!’’
गुरुंच्या आज्ञेनुसार कृष्णा स्वारांनी अंगावर भगवे घेतले. ते गोसावी झाले. संसारी सुखातून ते पणूर् विरक्त बनले. घरी मातेच्या आज्ञा, सेवेतून वैराग्य मठीत महाराजांच्या आज्ञा सेवेत रहावे ही आता कृष्णास्वारांची आयुष्याची इति कर्तव्यता झाली. बलदंड प्रकृतीचे कृष्णास्वार अपस्मारीच्या त्रासाने नंतर मग हैराण झाले. तशात त्यांची प्रकृती खालावली तरी पण त्यातून त्यांनी महाराजांची सेवा सोडली नाही.
‘‘बाळकू (स्व. बाळकृष्णा राशिवडेकर) नंतर तूच माझा खरा वारु’’ (घोडा) म्हणून महाराज बाहेर कुठेही निघाले की कृष्णा स्वारांच्या खांद्यावर आवडीने बसत व कृष्णा स्वार पण हनुमंत जसे प्रभू राम लक्ष्मणांना घेऊन डौलात जात तसे महाराजांना स्वत:च्या खांद्यावर घेऊन ते सांगतील तिथे तास न तास घेऊन जात.
महाराज बाहेर निघाले की त्यांचे भाष्य सूचक असे. भ३तांच्या मेळाव्यात त्यांचा उलगडा ज्यांचा त्यालाच होत असे. इतर भक्त ते ऐकून स्तब्धच रहात. अशाच अनेक भ३तांच्या मेळाव्यात महाराज प्रयाग संगमी निघाले असता कृष्णा स्वारांना परत महाराज उद२गारले ‘‘हे बघ कृष्णा बाळकू नंतर तूच माझा खरा वारु!’’ कृष्णा स्वार म्हणाले ‘‘महाराज तुमची कृपा’’ महाराज परत उद२गारले ‘‘अरे पूर्वी तू विठूरायाला भुलवले होतेस! तुझे वैभव आम्हांला माहीत आहे!’’
महाराजांच्या ह्या उ३तीतला अर्थ कृष्णा स्वारांच्या व्यतिरी३त कोणत्याही भ३ताच्या लक्षात आला नाही. तेव्हा त्या पैकी एकाने ह्याचा खुलासा कृष्णा स्वारांना विचारला तेंव्हा कृष्णा स्वार म्हणाले ‘‘माझ्या मातोश्रींचे वडील म्हणजे माझे आजोबा पूर्वी वारकरी असून ते पण छत्रपतींच्या दरबारी द्वारपाल म्हणून होते. रजा काढून ते आषाढीची पंढरीची वारी नियमित करीत असत. त्यात कधीही खंड पडला नाही. पण उतारवयात पूर्वी सारखी अंगात श३ती राहिली नाही. त्यामुळे पंढरीच्या वारीसाठी पूर्वी पेक्षा दुप्पट वेळ लागू लागला. अशाच एका वारीच्या वेळी कोल्हापूरला परत यावयास चार दिवस अधिकच उशीर झाला. आता आपल्यावर छत्रपतींचा रोष होणार. काय करावयाचे? या चिंताग्रस्त भयभीत मनःस्तिथी आपल्या सहकार्यास विचारले ‘‘मी वेळेवर कामावर हजर झालो नाही म्हणून माझ्यावर छत्रपती रागावले आहेत की काय?’’ ते म्हणाले ‘‘कशाबद्दल?’’ आजोबा म्हणाले ‘‘रजा संपून चार दिवस होऊन गेले, तरी मी आलो नाही, आज मी कामावर हजर होत आहे म्हणून तुला विचारतो?’’
ते सहकारी म्हणाले ‘‘तू रजा संपल्याबरोबर कामावर हजर झालास! चार दिवस झाले, तू काम पण केलेस आणि भ्रम झाल्यासारखे आज असा काय विचारतोस? कसली तुला अशी विस्मृती झाली आहे?’’ तेंव्हा तो आजोबा म्हणाला ‘‘विस्मृती ! मला नाही झाली आहे, तुम्हालाच झाली आहे.’’ सहकारी म्हणाले ‘‘सत्य असत्य एक जाणे विठ्ठल ! तुझीच ही भूल ! आम्हांला असत्य बोल बोलण्याची गरजच काय?’’
सहकाऱ्यांच्या बोलण्याने आजोबा पण दि२गमूढ झाले जिवाभावाचे सहकारी असत्य आपल्याशी झाले. आपल्या गैर हजेरीत विठ्ठलाने आपली नोकरी केली. चार दिवस माझे काम ह्या पंढरीनाथाने केले. त्याला मी व्यर्थ श्रमविले ! आता मला छत्रपतींची नोकरी नको! आता मी आमरण विठूरायाची नाके री करीन. वाधर्३ याची सबब सागं नू छत्रपतींच्या नाके रीचा राजीनामा दिला आणित्यांनी विठूरायाच्या भ३ितत उर्वरीत आयुष्य काढले! हा सर्व वृत्तांत कृष्णा स्वार सांगत असता सर्व भ३त एकाग्र चित्ताने ऐकत होते. शेवटी कृष्णास्वार म्हणाले ‘‘तो माझा आजोबा म्हणजे माझाच तो पूर्व जन्म असावा म्हणून महाराज म्हणाले.
तुझे वैभव आम्हा ठावे । मजला म्हणती जातीवंत
भुलविला पंढरीनाथ । ऐसाच वाटे याचा अर्थ
तुमचे स्वमत पहा कैसे ।
महाराज माझ्या खांद्यावर बसतात त्याचे मागील हे एक गमक आह.’’ ह्या वृत्तांतात कृष्णा स्वाराच्ं या बाले णयात ‘‘मी’’ पणा आलेला होता. महाराज तेंव्हा कृष्णास्वारांना म्हणाले ‘‘आता मला खाली उतर!’’ त्याचप्रमाणे महाराजांना खाली उतरण्यात आल्यावर महाराज म्हणाले ‘‘आज कसला हा दिवस ? पात्रं सगळी मलीन झालीत!’’ कृष्णा लाड तेव्हा समोर आलेले पहाताच त्यानां उद्देशून महाराज म्हणाले ‘‘हे प्रसिध्द वाहन ! ह्यावर आरुढावे असे वाटत. ह्याचा स्वभाव कांही जड नाही! कृष्णा लाड तेंव्हा म्हणाले ‘‘महाराज! सुखाने बसा माझ्या खांद्यावर ! तुमची कृपा असल्यावर सहज आपण ठरविलेल्या स्थळी आरामात पोहचू’’
त्या बरोबर कृष्णास्वार मनातल्या मनात वरमले. आपल्यातला ‘‘मी’’ पणा हा बरा नव्हे. महाराजांना तो आवडला नाही. म्हणून त्यांनी ही एक प्रकारची मजला शिक्षाच केली आहे. ह्याच ‘‘मी’’ पणात तारामती होत्या. त्यांना पण त्यातून जागे करण्यासाठी मग महाराजांनी सर्वच भ३तांचा त्याग प्रयाग संगमी केला; फक्त कृष्णा लाड व वासुदेव दळवी ह्यांच्या समवेत सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून राजापूरादी ठिकाणी जाऊन २१ दिवसांनी परत कोल्हापूरला आले. ह्या घटनेपासून भक्तांना घ्यावयाचा धडा ते घेतला. ह्यानंतर बराच कालावधी गेला. एक दिवस महाराज कृष्णा स्वारांना म्हणाले ‘‘तुझा आजोबा वारकरी होता तेंव्हा तू पण पंढरीला जाऊन ये!’’ कृष्णा स्वार म्हणाले ‘‘महाराज! तुम्हीच साक्षात आमचे पंढरीनाथ असतांना कशाला आणखी एवढ्या दूर पंढरीला पाठविता?’’ तर गुरुबंधू पण कृष्णा स्वारांना म्हणाले तुमची वृत्ती माळकऱ्यांची तेंव्हा पंढरपूरच्या वारीची निश्चिती कराच!
त्याच दिवशी कृष्णा स्वारांना स्वप्न दृष्टांत झाला कोणी एक माळकरी कृष्णास्वारांना म्हणाला ‘‘तुम्हांला पंढरीनाथ बोलावीत आहे’’ हा स्वप्नदृष्टांत श्री गुरुंची आज्ञा व पंढरीला जाण्याचे गुरुबंधूचा आग्रह हे सर्व कृष्णास्वारांनी आपल्या मातोश्रींना सांगितले. पंढरीला जाण्यासाठी त्यांनी पांच रुपये पण जमवले. तेंव्हा कृष्णा स्वारांच्या मातोश्री म्हणाल्या, ‘‘घरात दैन्य दारिद२्रय! पोटभर अन्न खावयास मिळत नाही आणि त्यात तुला होणारा अपस्मारीचा त्रास कसा काय तू पंढरीची वारी करणार?’’
तेंव्हा कृष्णा स्वार म्हणाले, ‘‘माते, माझ्याजवळ पांच रुपये आहेत. प्रवास खर्चाला ते मी पुरवीन. फक्त तू मला जाण्याची अनुज्ञा दे.’’ तेव्हा ती माता म्हणाली ‘‘माझ्या अंगावर धड लुगडं नाही. आधी त्या पैशात कसलं तरी एक लुगडं आणून दे.’’ कृष्णा स्वारांच्या पुढ्यात संकटासमोर संकट उभे राहिले. पण लागलीच त्यांनी मनाशी विचार केला.
माते समान दैवत । शोधिता नाही त्रिभुवनात
पुरवू तिचा मनोरथ । जाऊ चालत पंढरीसी ॥
जन्म दिला तिला परमेश्वराचं प्रति रुप समजणारे हे कृष्णा स्वार कोणी विद्या व्यासंगी, थोर पंडित नव्हते! शिक्षणाचं ज्ञान नसणाऱ्या ह्या कृष्णा स्वारांच्या अंगी वेदश्रुतीने गौरविलेलं एक महत२तत्व ‘‘मातृ देवो भव!’’ हे मात्र चांगलच भिनलं होतं! त्यांनी मनाचा निर्धार केला. काय लागतील कष्ट ते लागो आपुल्या पंढरीच्या वारीला; पण मातेचं दु:ख-कष्ट आधी निवारुया! ह्या पैशात आपण एक चांगले लुगडं घेऊन मातेला देऊया. मग आपण पंढरीला पायी चालत चालत जाऊन येऊया! ह्या विचारासवे त्यांनी एक चांगले लुगडं आणून मातेला दिले व वैरा१⁄२य मठीत येऊन महाराजांचा निरोप मागणार तोच महाराजच कृष्णा स्वारांना म्हणाले ‘‘बरे केलेस पोरा! तू काय पंढरीला चालत जाऊ नकोस येथे जी आश्वशाळा आहे नां तेथे तू त्वरीत जाऊन ये!”
गुरूंची आज्ञा शिरसावंद्य करुन कृष्णा स्वार त्वरीत रिसाल्यात गेले. स्वत: ते पंढरीला पायी जाणार असल्याची वार्ता येथे सर्वश्रूत झाली होती. कृष्णा स्वारांना पहाताच एका मित्राने येऊन आपले पण हितगुज त्यांना सांगितले. तो मित्र म्हणाला, ‘‘तू पंढरीला जाणार आहेस ना? आम्ही पण पंढरीला जाणार आहे. प्रत्येक वर्षी मी एकटाच पंढरीची वारी करत असतो. ह्या वळे से माझ्या बायकोने पढंरीनाथाच्या दर्शनाचा अगदी आगह्रच धरल्यामुळे आम्ही शकटाराहेण करुन उद्या पंढरीला जावे म्हणतो. आमच्या माघारी एक आमची जी घोडी आहे तिची देखभाल कोण करणार? तेव्हा ती घोडी घेऊन तू पंढरीला जा. तू एकटाच आहेस, आम्ही दोघे आहोत तेंव्हा तू घोडीवर बसून आरामात पंढरीला जा!’’ कृष्णा स्वारांनी त्वरीत ते मान्य केले. ह्या घटने मागचे सूत्रधार आपुले दयावंत श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजच आहेत हे त्यांच्या लक्षात आले. महाराजांच्या आज्ञेने आणि कृपेने पंढरीला जाणेसाठी एक घोडी मिळाली.
दुसऱ्या दिवशी मातेचे प्रथम चरण दर्शन घेतले. तिने पण सुखाने आशीर्वाद दिला. मग वैरा१⁄२य मठीत येऊन महाराजांच्या आशीर्वाद-आज्ञा-दर्शनासाठी येताच महाराज म्हणाले, ‘‘स्वारा! आता जा खुशाल घोडीवर बसून! आणि ये सुखात पंढरी-राजाचं दर्शन घेऊन! तुला आता पासून कधीही अपस्मारीचा त्रास होणार नाही. जा!’’ कृष्णा स्वारांचे अंत:करण भरुन आल.े एकादधु र्र व्याधीतनू महाराजानं ीआपल्यालाकायमचचे साडे वल.े ह्याकृतज्ञतने ेमहाराजाच्ं या चरणावर साष्टांग प्रणिपात केला. त्यांचा व गुरुबंधूचा निरोप घेवून कृष्णा स्वार घोडीवर आरुढ झाले. महाराजांच्या नाम रुप स्मरणांत; विठूरायाच्या भजन गुंजनात पंढरीला आले पण पंढरी। भू वैकुंठ रमारमणाचे पीठ वैष्णवांनी फुलून निघालेल्या त्या भगवंताच्या दरबारात आत दर्शनाला जाणे दुरापास्त झाले. ती प्रचंड गर्दी म्हणजे जणू भगवंताच्या भ३ितचं उठलेले मोहळ! राऊळात पाय ठेवावयास जागा नाही. दर्शन आता कसे होणार ह्या चिंताग्रस्त होत निघालेल्या मनाला लागलीच ‘‘निजबोध’’ झाला! भ३तांना निजबोध बहाल करणारं श्रीकृष्णसरस्वती महाराजांच्या सारखं दुसरे दैवत कुठेही शोधून मिळणार नाही!
‘‘ज्या सद२गुरुंनी येथेवर पाठविले आहे, तेच पुढची काळजी दूर करतील’’ असा विचार महाद्वारातच कृष्णा स्वारांच्या मनात येतो ना येतो तोच त्यांच्या शेजारी आगंतुक एक पुजारी असलेला त्यांना दिसला ! आपण म्हणावयाचा ……. आगंतुक नाही तर तो पण होता अगदी क्षणा पूर्वीचा का होईना पण तो पूर्व नियोजित! कृष्णा स्वारांनी त्याला स्वत: कोल्हापूर सारख्या दूरच्या ठिकाणाहून आलेला, अपस्मारीनं बेजार झालेला व त्यातच भगवंताच्या दर्शनाला आतुर झालेला आपला मनोदय सांगितला! त्वरीत त्या पुजाऱ्याने स्वत:चा खास अधिकार वापरला म्हणावयाचं! त्याने कृष्णा स्वारांना त्या हजारोंच्या झुंडीतून कांही क्षणातच वाट काढत विठूरायांच्या चरणा जवळ आणून उभे केले व म्हणाला, ‘‘विठोबा-विठोबा पाहिजे होताना, घ्या ह्या विठोबाचं दर्शन!’’
कृष्णा स्वारांनी दशर्न घतेलं पण तिथं विठोबा कुठं होता? तिथं तर त्याला श्रीकृष्णसरस्वती महाराज दिसले. म्हणून त्यांनी गाभाऱ्यातील सर्व पुजाऱ्यांना विचारले, ‘‘तुमचा विठोबा कुठे आहे?’’ त्यावर ते बडवे म्हणाले, ‘‘हा काय इथे उभा आहे’’ तेंव्हा स्वार म्हणाले ‘‘हे तर आमचे सदगुरु श्रीकृष्णसरस्वती महाराज! शुभ्र अंगरखा, टोपी आणि मौतिक माळा घालून सिंहासनी विराजमान झाले आहेत.’’ते पुजारी म्हणू लागले, ‘‘अरे कुठला तुझा सद२गुरु? हा तर आहे रमावरु भरजरी पितांबर घालणाऱ्याला तू म्हणतोस अंगरखा घातलाय! रत्नजडीत किरीट कुंडलानी मंडित असणाऱ्याला म्हणतोस टोपी घातली, अठ्ठावीस युगे उभे राहून करकटी असणाऱ्या ह्या पंढरीनाथाला तू म्हणतोस ‘‘सिंहासनाधिष्ट झालाय’’ काय, भ्रमिष्ट झालास की काय तू?’
इथं आता वादविवाद कांही उपयोगाचा नाही असे ठरवून कृष्णा स्वारांनी सद२गुरु रुपी त्या देवाचे कांहीक्षण चरणावर भाळ ठेवून श्रीमुख पहातात तो तेथे सद२गुरु श्रीकृष्णसरस्वती महाराजांच्या ऐवजी करकटी श्रीविठ्ठलाचे दर्शन झाले. गुरुंच्या जवळ सर्व दैवते असतात असा कृष्णा स्वारांचा दृढ विश्वास होताच मग त्यातून हा पंढरीचा विठोबा तरी दूर तो आणि कुठे जाणार? ही सर्व करणी आपल्या सद२गुरुंचीच आहे! हे त्यांच्या लक्षात येण्याला कांही उशीर लागला नाही. विठूरायाचे दर्शन झाल्यावर कृष्णा स्वारांच्या मुखी उद२गार आले ‘‘पंढरीराया तुम्ही मोत्यांचा हार दाखवण्यासाठी तुळशी माळा दूर केल्या वाटते. सुवर्णालंकृत किरीट कुंडलांचा साज लपवून शुभ्र अंगरखा तुम्ही घातलात. युगान युगं २८ युगे तुम्ही ह्या विटेवर कर कटावर ठेऊन उभे राहून शिणलात. तो थकवा परिहार व्हावा म्हणूनच की काय आमच्या सद२गुरु श्रीकृष्ण सरस्वती महाराजांच्या रुपात क्षणभर का होईना सिंहासनावर विराजमान होऊन बसलात, बसा बसा!’’ असे म्हणून श्रीविठ्ठलाचे दोन्ही जघन दोन्ही हातांनी कांही क्षण चुरत – चुरत श्री चरणावर नत मस्तक झाले. त्या पंढरीराजाचा मग निरोप विनम्र भावाने घेऊन त्यांनी कोल्हापूरचा मार्ग धरला. सद२गुरुंच्या नामरुप स्मरणांत विनासायास ते कोल्हापूर वैराग्य मठात येऊन दाखल झाले. महाराजांच्या चरणावर लोटांगण घातले व महाराजांना म्हणाले, ‘‘महाराज तुम्ही इथेही! आणि पंढरीतही! तुम्हीच महाराज स्वांगे त्रैलो३याला नटवले आहे! देवा, आता मला तुमच्या चरणांपासून कुठेही दूर पाठवू नका. मला तुमच्या जवळ कायमचेच ठेवा!’’ महाराज म्हणाले ‘‘अरे कृष्णा! तू माझाच स्वार आहेस! तुला दूर लोटून मी आणखी कुठलं दुसरे घोडं हुडकू! तु माझ्या जवळच रहा हं!’’ पंढरीचा साक्षात्कार, महती कृष्णा स्वारांनी आपल्या गुरुबंधूना सांगितली त्यामुळे सर्व भ३तांचीच निष्ठा श्री गुरुचरणापाशी अधिक दृढ झाली. हे जग श्री गुरुमय आहे.
महाराजांनी समाधी घेतल्यावर सर्व शिष्य भ३तांची पांगापांग झाली. नंतर कोल्हापूरला दर १२ वषारनी येणाऱ्या हिमालयातील नं१⁄२या गोसाव्यांच्या झुंडीतून कृष्णा स्वार हिमालयाला गेले व नंतर येणाऱ्या झुंडीतून १२ वषारनी कोल्हापूरला आले. ह्या नागव्या गोसाव्यांच्या बरोबर त्यांनी तीर्थयात्रा केली म्हणून कोल्हापूरातील श्रीकृष्ण सरस्वतींचे भ३त त्यांना नंगेबुवा म्हणून पण संबोधू लागले. हिमालयाच्या तीर्थयात्रेतून १२ वषारनी परत जेंव्हा कृष्णास्वार कोल्हापूरला आले तेंव्हा त्यांना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी पण ओळखले नाही. ते स्वत:च्या भावाच्या घरात शिरले. स्त्रियांच्या शिवाय घरी पुरुष माणूस कोणीही नव्हते. तेंव्हा घरातील ती भावजय स्वयंपाक घरात आलेल्या ह्या कृष्णा स्वारना पाहून भय भीतीने ओरडू लागली तेंव्हा कृष्णास्वार म्हणाले, ‘‘अहो वहिनी मी कृष्णा! तुम्ही घाबरता कशाला? मी दुसरा तिसरा कोणी नसून तुमचाच दीर आहे! तुम्ही मला ओळखले नाही का?’’ मग त्या वहिनीने स्मित आनंदाने येऊन त्या भावोजींचे कृष्णास्वाराचे चरण दर्शन घेतले.
त्यानंतर सन १९४४ पयरत महाराजांच्या वैरा१⁄२य मठीतच कृष्णास्वार होते. त्यांनी एकदा आपल्या नुसत्या डो३यावरच्या जटांनी मंदिरात नासधूस करणाऱ्या घुशीला एका तडाख्यातच खलास केले हाते. यावरुन त्यांच्या जटांविषयी कल्पना येईल. मंदिरात संचारलेल्या या पिशाच्याच्या छाताडावर ते स्वत:चा उजवा पाय ठेवत. त्या परिणामे त्वरित ती व्य३ती पिशाच्चबाधेतून मुक्त होत असे. त्यांचे अनुभव मिरज, अर्जुनवाड, टाकळी व चंदूर आदी ग्रामस्थांना आले आहेत. मिरजेला असतांना ते श्री गुरुचरणी विलीन झाले. त्यांच्या मुलीचे चिरंजीव नातू अजूनसुध्दा टाकळी व चंदूर गांवी आहेत. मिरजेचे आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे श्री झेंडेमहाराज यांनी विशेष पुढाकार घेऊन श्री कृष्णास्वारांचे मंदिर कृष्णा घाटावर उभारले आहे. पंढरीच्या दरबारी पंढरीनाथांच्या ऐवजी सद२गुरु रुपांचे दर्शन कृष्णा स्वारांना महाराजांनी दिले ह्या वरुनच कृष्णा स्वारांची भ३ती सेवा किती श्रेष्ठ दर्जाची होती ह्याची थोडी तरी का होईना आपल्याला कल्पना येईल. त्यांचा पुण्यप्रद आदर्श आपल्याला सदैव प्रेरणादायी असाच आहे. त्यांच्या चरणी आमचे कोटी कोटी प्रणाम
लेखक :- श्री. बाळासाहेब शां. नाडकर्णी, कोल्हापूर
संदर्भ :- श्री. श्रीकृष्ण सरस्वती पुण्यतिथी विशेषांक