यशवंतनगर, सांगली. – Yashwantnagar, Sangli
मराठी
श्रीहनुानदासजी महाराज यांचा परिचय मला डॉ. बिंदुसार पलंगे व डॉ. केदारीप्रसाद कुलकर्णी, सांगली यांच्यामुळे सन २००१ च्या आसपास झाला. त्यावेळी त्यांचे वय अंदाजे ६५ ते ७० वर्षे असावे. ते बालब्रह्मचारी व एका विशिष्ट कोटीचे सिद्धपुरुष होते. त्यांना ईेशरी साक्षात्कार झालेला होता. त्यांचे जीवन फार अद्भुत होते. त्यांचे मूळ गाव येळावी, ता. तासगाव, जि. सांगली. त्यांच्या प.पू. वडीलांचे नाव अनंत गोविंद जोशी तर मातोश्रींचे नाव रुक्मिणी अनंत जोशी असे होते. अशा पुण्यûलोक माता-पित्यांच्या पोटी श्रीहनु ानदासजी महाराजांचा जन्म फाल्गुन शुद्ध प्रतिपदा, रविवारी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी म्हणजेच रविवार दि. २३/२/ १९३६ रोजी बेळगाव, अनगोळ येथे झाला.
त्यांच्यावर प्रज्ञाचक्षू श्रीचरणानंद सरस्वती नावाच्या एका संत महापुरुषाची कृपा वयाच्या १२ व्या वर्षी झाली. त्यांनी त्यांना श्रीराम जयराम जय जय राम हा मंत्र दिला. उत्तर आयुष्यात सर्व भारतभर भ्र ण केले. हिमालयात भ्रंती, नर्मदा प्रदक्षिणा बऱ्याच वेळा केल्या.
एकांतवास व तीव्र साधना यात त्यांनी आपुले आयुष्य व्यतीत केले. पूर्व भाग्याने मला यांचा अल्पसा सहवास व कृपा लाभली. आजच्या काळात जानवी (यज्ञोपवीत)विकून उदर निर्वाह करणारे ते एक थोर सत्पुरुष. त्यांनी श्रावण वद्य अष्टीयुक्त नवमी दि. १०/८/२०१२ रोजी दोन प्रहरी १ वाजून १७ मिनिटांनी आपला अवतार काल संपविला.
लेखकाचे नाव : श्री झेंडे महाराज
संदर्भ ग्रंथ : कृतज्ञता – पान क्रमांक २४९
I was introduced to Shri Hanumandasji Maharaj through Dr. Bindusar Palange and Dr. Kedariprasad Kulkarni of Sangli around the year 2001. He was approximately 65 to 70 years of age at the time. He was a Bal Bramhachari and was a Siddha Purush of a special kind. He had witnessed the Almighty. His life was very marvelous. His native place was Yelavi (Tasgaon Taluka, District Sangli). His father’s name was Param Pujya Anant Govind Joshi and his mother’s name was Rukmini Anant Joshi. Shri Hanumandasji Maharaj was born to such Punya Shlok parents in Angol Belgaum on Sunday, 23 February 1936 at 10.10 AM (Falgun Shudh Pratipada).
At the age of 12, he was blessed by the intelligent Saint Shri Charanand Saraswati. The latter gave him the mantra of Shri Ram Jay Ram Jay Jay Ram. He traveled throughout India. And circumnavigated (‘Pradakshina’) the Narmada River and Himalayas many times.
He spent his life in solitude and doing intense Sadhana. Due to my pre merits, I spent some time in his company and was blessed by him. In today’s world, it can be said that he sold his ‘Janavi’ (Literal meaning is Yadnyopavit – Sacred thread. Meaning in context is by selling his knowledge/services) to pay for his livelihood. He finished his time on earth as an Avatar on 10 August 2012 (Shravan Vadya Asthamiyukt Navmi) at 1.17 PM.
Author: Shri Zende Maharaj
Marathi Reference Book: Krutagyata. Page 249.