श्रीम्हादबा पाटील महाराज ( धुळगावकर ) – Shri Mhadba Patil Maharaj ( Dhulgaonkar )

मराठी
कल्पवृक्षाच्या छायेत

विसाव्या शतकात अनेक थोर सत्पुरुष संत होवून गेले त्यांपैकी एक श्रीम्हादबा पाटील (धुळगावकर) होय. त्यांचा जन्म आश्विन शुद्ध त्रयोदशी, सोवार, शके १८३८ दि. ९/१०/१९१६ रोजी धुळगाव (डुबल धुळगाव), ता. तासगाव, जि-सांगली येथे झाला. त्यांच्या वडीलांचे नाव श्री. बाबगोंडा पाटील तर आईचे नाव बायाक्का असे होते. श्री. बाबगोंड पाटील हे गावचे पाटील होते. ते श्रीदत्त भक्त असल्याने दर पौर्णिेला नृसिंहवाडीला श्रीदत्त दर्शनाला जात. श्रीनृसिंह सरस्वतीनीच त्यांच्या पोटी अवतार घेतला, असे समजणेस हरकत नाही.

श्रीम्हादबा पाटील महाराज हे नेहमी विदेही अवस्थेत वावरत. त्यांचा मुख्यत: वावर मिरज, सांगली, इचलकरंजी, कुरुंदवाड, नृसिंहवाडी व सर्वत्र असे. त्यांच्या गुरूंचे नाव श्रीरामानंद महाराज खटावकर (नांद्रे-खटाव) होते. श्रीम्हादबा महाराजांचा सर्वत्र वावर पायी, सायकल, मोटर सायकल, टांगा, बैलगाडी मिळेल त्या वाहनाने असे. आपल्या भक्तांना थोडाही त्रास न होवू देण्याची त्यांची इच्छा असे. शेवटपर्यंत त्यांनी एक रूपायाला हात लावला नाही. एक रुपायाही जवळ ठेवला नाही. असे ते निरीच्छ होते.

धोतर, कोट, डोक्याला पटका, रुमाल, पायात कापडी बूट असा त्यांचा पेहराव असे. हातात काठी असे. त्यांचे बरेच पाहुणे आमच्या पाटील गल्लीत राहत असल्याने लहानपणापासूनच मला त्यांचे दर्शन घडत असे. पौर्णिमा ते संकष्टी असे चार दिवस मिरजेतील सतारमेकर गल्लीतील महासाधू आण्णा बुवांच्या मंदिरात संध्याकाळी येत. त्यांच्या दर्शनाला तेथे बरीच गर्दी होई. ते दत्त अवतार होते. त्यांचा थोडा फार सत्संग मला झाला, हे माझे महाभाग्य.

श्रीम्हादबा पाटील महाराज यांनी आपल्या भक्तांना पूर्व कल्पना देवून, दुचिन्हे दाखवून ज्येष्ठ पौर्णिा (वटसावित्री पौर्णिा) रविवार शके १९०४ दि. ६ जून १९८२ सकाळी ६.०५ मिनिटांनी श्रीक्षेत्र नृसिंहवाडीला समाधी घेतली. त्यांच्या समाधी मंदिराचे व मठाचे बांधकाम त्यांचे सत्शिष्य पद्मश्री. डॉ.श्री. डी. वाय. पाटील साहेब व भक्त परिवाराने नृसिंहवाडीत केले.

लेखकाचे नाव : श्री झेंडे महाराज
संदर्भ ग्रंथ : कृतज्ञता – पान क्रमांक २४६

English

Underneath the shade of ‘Kalpa Vriksha’ (The wishing-tree of Indra’s heaven)

The twentieth century has witnessed many saints. One of them was Shri Mhadba Patil (Dhulgaonkar). He was born on Monday, 9 October 1916 (Ashwin Shudh Trayodishi. Shake 1838) in Dhulgaon (Dubal Dhulgaon, Taluka Tasgaon, District Sangli). His father’s name was Shri Babgonda Patil and his mother’s name was Bayakka. Shri Babgonda Patil was a Patil (A leadership position) of the village. Since he was a devotee of Shri Datta, he used to visit Narsinhwadi for Shri Datta’s Darshan on every full moon day. It would not be wrong to consider that Shri Narsinh Saraswati took birth as his son.

Shri Mhadba Patil always remained disembodied. He mainly traveled between Miraj, Sangli, Ichalkaranji, Kurundwad, Narsinhwadi, and other places. His Guru’s name was Shri Ramanand Maharaj Khatavkar (Of Nandre – Khatav village). Shri Mhadba Maharaj traveled by foot, bicycle, motorcycle, horse-cart, bullock-cart, and any vehicle he could find. He always wished that his devotees should not bear the slightest of hassle. Until his end, he did not touch a single rupee. He did not keep a single rupee near him. He was such a desire-less person.

His usual costume was made of a Dhotar (Dhoti), coat, turban, handkerchief, and cloth shoes. He carried a stick in his hand. Many of his relatives lived in our Patil Gully in Miraj. So, since childhood, I used to have his Darshan. He visited Maha Sadhu Anna Buva’s Temple in Miraj’s Sitarmaker Gully 4 days in a month from the full moon day to Sankashti (The fourth lunar day of every dark fortnight. It continues until moonrise). A large crowd used to gather for his Darshan. He was a Datta Avatar. I was lucky enough to spend some time with him.

Shri Mhadba Patil Maharaj informed his devotees and showed inauspicious signs before taking Samadhi in Narsinhwadi on Sunday, 6 June 1982 (Jeshth Pournima / Vatsavitri Pournima, Shake 1904) at 6.05 AM. His Samadhi, Temple, and Mathi was built by his true disciple Padmashri Dr. D. Y. Patil Sir and other devotees in Narsinhwadi.

Author: Shri Zende Maharaj
Marathi Reference Book: Krutagyata. Page 246.

Comments are closed.