
मानवधर्म असलेल्या चिमड संप्रदायातील एक थोर सत्पुरुष म्हणजे श्रीदासराम महाराज. यांचे पूर्ण नाव श्रीराम गोविंद केळकर होय. त्यांच्या आईचे नाव इंदिराबाई. श्रीदादांचा जन्म शके १८४२, श्रावण वद्य षष्ठी, गुरुवार दि. ६/८/१९२० रोजी त्यांच्या मामांच्या घरी म्हणजे कुरुंदवाडला झाला. श्रीदादा हे श्रीतात्यासाहेब कोटणीस महाराजांचे कृपांकित शिष्य होते. वयाच्या केवळ पाचव्या वर्षापासून दादांनी कीर्तने सुरू केली व ती अखेरच्या श्वासापर्यंत चालू ठेवली. श्रीदादा हे संसारात राहून सिद्ध संत झालेले होते. श्रीदादांनी प्रपंचात राहून सामान्यांना, सर्व थरातील लोकांना परमार्थ शिकवला. दुसऱ्यांना चांगले म्हणणे हा त्यांचा स्थायिभाव होता. कोणत्याही प्रसंगी त्यांच्यात अष्टभाव जागृत होवून त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहात. ते अतिशय प्रेळ व कोल अंत:करणाचे थोर संत होते. त्यांना श्रीज्ञानेेशरी, श्रीदासबोध, श्रीतुकाराम गाथा, श्रीगुरुलिंग गीतामधील अभंग मुखोद्गत होते. पूर्व भाग्याने मला श्रीदादांचा सहवास व कृपा १९८० आसपास लाभली व माझ्यावर कृपाही झाली. श्रीदादांनी श्रावण शुद्ध षष्ठी २५/७/२००१ रोजी रात्री ७.४० वाजता नागपंचमी दिवशी आपले अवतार कार्य संपविले. त्यांचे पुढील कार्य श्री.चंद्रशेखर आण्णा अतिशय प्रेळपणे, समर्थपणे चालवीत आहेत.
लेखकाचे नाव : श्री झेंडे महाराज
संदर्भ ग्रंथ : कृतज्ञता – पान क्रमांक २४७
Shri DasRam Maharaj, Sangli
‘Chimad Sampraday’ believes in human religion. One of the great ‘Satpurushs’ from this ‘Chimad Sampraday’ was Shri DasRam Maharaj. His full name was ShriRam Govind Kelkar. His mother’s name was Indirabai. Shri Dada was born on Thursday, 6 August 1920 (Shake 1842, Shravan Vadya Pashti) in his maternal uncle’s place in Kurundwad (District Kolhapur, Maharashtra). Shri Dada was the blessed student of Shri Tatyasaheb Kotnis Maharaj. He started singing Kirtans from the tender age of 5 and he continued them until his last breath. Shri Dada remained a family man but became a Siddha saint. Staying in his family life, he taught ‘Parmaarth’ (The attainment and enjoyment of the Divine nature) to people of all strata within the society. It was his nature to consider everyone as a good person. On any occasion, his ‘Ashtha Bhaav’ (eight affections within the body) would awaken and he would get overwhelmed with teary eyes. He was a great saint of extremely loving and gentle conscience. He had memorized entire books like Dyaneshwari, Shri Das Bodh, Shri Tukaram Gatha, and the Abhangs from Shri Guruling Geeta.
It was my good fortune to have received his blessings and spent time in his company around 1980.
Shri Dada finished his Avatar on 25 July 2001 at 7.40 PM on the auspicious day of ‘Naag Panchami’ (Shravan Shudh Pashthi). His further work is carried-on lovingly and capably by Shri Chandrashekhar Anna.
Author: Shri Zende Maharaj
Marathi Reference Book: Krutagyata. Page 247.