
श्रीगोविंद महाराज कुलकर्णी यांचा जन्म दि. २ जुलै १९२१ रोजी ब्रह्मनाळ (जि. सांगली) येथे झाला. त्यांच्या वडीलांचे नाव बाळकृष्ण तर आईचे नाव सरस्वती होते. त्यांना तीन भाऊ व तीन बिंहणी होत्या. त्यातील गोपाळराव हे त्यांचे भाऊ, श्रीपांडुरंग महाराज ताम्हनकर यांचे ते शिष्य होते. श्रीपांडुरंग महाराज ताम्हनकर हे श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या शिष्य परंपरेतील होते. सन १९५७ साली मार्गशीर्ष वद्य १४ ला गोविंद महाराजांना श्रीपांडुरंग महाराज ताम्हनकर यांनी विधिवत दीक्षा देवून त्यांना अवधूत संप्रदाय चालविण्याची आज्ञा केली. पटेल चौक सांगली येथे त्यांचे कुलकर्णी बंधू टी क्लब म्हणून प्रसिद्ध हॉटेल होते. या हॉटेलची सर्व व्यवस्था श्रीगोविंद महाराज पहात. झोपडपट्टीतील लोकांपासून ते श्रीमंत वर्गापर्यंत त्यांनी पायी, सायकलीवरून फिरून अवधूत संप्रदाय वाढविला. त्यांचा माझा परिचय स्व. बाबूराव सूर्यवंशी यांच्यामुळे आला. ते अतिशय साधे, प्रेळ, आपुलकी, माणुसकी असणारे संत होते. दर मंगळवारी सूर्यवंशी दादांच्या घरी आम्ही दोघे आरतीला असू. ते सुंदर भजने, पदे म्हणीत. त्यांचा सत्संग माझ्यासाठी मोलाचा राहिला. त्यांनी दि. २४ मार्च २००३ रोजी रात्री ११.३० वाजता आपले अवतार कार्य संपविले. त्यांची समाधी सांगलीत कृष्णा नदी काठी श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर मंदिराच्या आवारात आहे.
लेखकाचे नाव : श्री झेंडे महाराज
संदर्भ ग्रंथ : कृतज्ञता – पान क्रमांक २४८
Shri Govind Maharaj Kulkarni, Sangli.
Shri Govind Maharaj Kulkarni was born on 2 July 1921 in Bramhanal (Near Sangli). His father’s name was Balkrishna and his mother’s name was Saraswati. He had 3 brothers and 3 sisters. One of his brothers, Shri Gopalrao was a student of Shri Pandurang Maharaj Tamhankar. The latter was from the disciple-tradition of Shri Pant Maharaj Balekundrikar. In the year 1957 (Marg Shirsh Vadya 14), Shri Pandurang Maharaj Tamhankar gave Diksha to Govind Maharaj through a ritual and ordered him to carry forward the tradition of Avadhut Sampraday. He owned and managed a famous hotel in Patel Chowk (Sangli), by the name of ‘Kulkarni Bandhu Tea Club’. Traveling on foot and bicycle, he reached out to the people from the slums to the affluent ones and spread the ‘Avadhut Sampraday’. I was introduced to him through Lt. Baburao Suryavanshi. He was an extremely simple, loving, caring, and compassionate saint. Every Tuesday, both of us were present for the Aarti in Suryavanshi’s house. He sang beautiful Bhajans and poems. His company has remained significant for me. He finished his Avatar on the night of 24 March 2003 at 11.30 PM. His Samadhi is on the banks of Krishna River in Sangli in Shri Pant Maharaj Balekundrikar Temple’s premises.
Author: Shri Zende Maharaj
Marathi Reference Book: Krutagyata. Page 248.