नाथ संप्रदाय :-
श्री भगवान दत्तात्रेयाचेच दुसरे नाव अवधूत या अवधूतालाच नाथ संप्रदायात उपास्य देवत मानली आहे. भगवान शंकराइतकेच महत्त्व आहे. नाथ संप्रदायाला जोगी/योगी संप्रदायात म्हटले जाते. नाथ संप्रदायात दत्तात्रेय ही योगसिध्दी प्राप्ती करुन देणारी, सिध्दी प्राप्त करुन देणारी अवधूत अवस्था प्राप्त करुन देणारी देवता समजली जाते, नाथ संप्रदायात भगवानदत्तात्रेय-मच्छिंद्रनाथ-गोरक्ष नाथ यांची वर्णने नाथ संप्रदायाच्या लिखाणातून दिसून येतात. श्रीक्षेत्र गिरनार हे जसे श्री दत्तात्रेय तीर्थक्षेत्र आहे. तसे ते नाथ संप्रदायाचे तीर्थक्षेत्र आहे तर ‘‘अवधूत गीता’’ या ग्रंथाला या संप्रदयात अतिशय महत्व आहे. ‘‘अवधूत गीता’’ या ग्रंथात अवधूताची सर्व लक्षणे वर्णिली आहेत.
या संप्रदायाचा उगम इतर अनेक संप्रदायांप्रमाणे परमेश्वरांपासून झाला आहे असे दृष्टोत्पत्तीसयेते. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेलेले ब्रम्हानंद आपल्या हृठयोग प्रदीपिकेवरीलटीकेत (१-५) म्हणतात की, ‘‘आदिनाथ’’ किंवा ‘‘शिव’’ हेच सर्वप्रथम नाथ असून, ह्यापंथाचे संस्थापक ‘‘शिव’’ म्हणजे प्रत्यक्ष शंकरच होत.
आदिनाथ: शिव: सर्वेषां प्रथमो नाथ: । (ततो) नाथसंप्रदा: प्रवृत्त इति नाथसंप्रदायिनोवदन्ती । ‘‘यावरुन या पंथाला’’ ‘‘नाथसंप्रदाय’’ असे संबोधीले जाते. तथापि वाड:मयात त्याचे ‘‘सिध्दमार्ग’’, ‘‘अवधूतमार्ग’’ असेही उल्लेख आहेत. या पंथाचे अनुयायी योगमार्गावर जास्तभर देतात यामुळे याला ‘‘योगमार्ग’’ असेही नामाभिधान दिलेले आढळते. कांही सांप्रदायिकग्रंथातून याला ‘‘सिध्दमत’’, ‘‘योगबीज’’, ‘‘योगसंप्रदाय’’, ‘‘अवधूतमत’’, ‘‘अवधूतसंप्रदाय’’अशीही नावे दिलेली आढळात आहेत.
संप्रदायातील प्रमुख पुरुष
१. मत्स्येंद्रनाथ (शतक ९ वे, १० वे)
मत्स्येंद्रनाथांसंबंधी देखील अनेक आख्यायिका प्रसिध्द आहेत. या आख्यायिकांनी व्याप्त असलेला त्यांच्या जीवनवृत्तांताचा इतिहास पाहून त्यासंबंधी काही निश्चित मते तयार करणे, इतिहासतज्ज्ञांनाही कठीण गेले आहे. मात्र नाथसंप्रदायाचे प्रथम आचार्य, गोरखनाथांचे गुरु,कौलाचाराचे सिध्द पुरुष व नेपाळी परंपरेप्रमाणे अवलोकितेशराचे अवतार, इ. त्यांच्या वर्णनासंबंधाने कोणाचे मतभेद असण्याचे कारण नाही. यासंबंधीच्या अनेक आख्यायिकांपैकी एकदोन प्रमुख पुढीलप्रमाणे आहेत.
क्षीरसिंधूच्या परिसरात शंकरांनी पार्वतीस गुह्यज्ञान सांगितले. मत्स्यरुपात वावरणाऱ्या मत्स्येंद्राने तो ‘‘योगोपदेश’’ ऐकला व तो ‘‘निश्चलकाय’’ झाला. शंकरांनी हे जेंव्हा पाहिले तेंव्हा त्यांनी त्या निश्चलकाय मत्स्यावर पाणी शिंपडून त्यास दिव्य मनुष्यरुप दिले तेंव्हापासूनपुढे ‘‘सिध्द मत्स्येंद्रनाथ’’ प्रसिध्दीला आले.
२. ‘‘आदिनाथ गुरु सकळ सिध्दांचा । मत्स्येंद्र तयाचा मुख्य शिष्य । मत्स्येंद्रांनी बोधगोरक्षासी केला । गोरक्ष ओळला गहिनीप्रत । गहिनीप्रसादे निवृत्ती दातार । ज्ञानदेवा सारचोजविले ॥ ज्ञाने अभंग ; किंवा ‘‘शिवशक्ती निमित्त दाऊन । उपदेशिले निजगुह्यज्ञान ॥
निळोबा.
(१) ‘‘कौलज्ञान-निर्णय’’ हा ग्रंथ मत्स्येंद्रनाथांनी लिहीला असून या ग्रंथाच्या लिपीवरुन हा ग्रंथ ११ व्या शतकापूर्वी लिहीला गेला आहे, असे सिध्द होते.
मत्स्येंद्रांचा काल हा ९ व्या शतकाचा उतरार्ध किंवा १० व्या शतकाचा पूर्वार्ध असा येतो. महाराष्ट्रातील संतपरंपरे प्रमाणे ज्ञानेशरांचे आजे गोविंदपंत यांना गहिनीनाथांचा अनुग्रह व पणजे त्रिंबकपंत यांना गोरक्षनाथांचा अनुग्रह होता.
ज्ञानेशरांचा काल इ.स. १२७१ ते १२९६ असा आहे.
मत्स्येंद्रनाथांची ग्रंथ रचना :-
नाथसंप्रदायांतील या सर्वप्रथम नाथांच्या नावावर फारच थोडे वाड्:मय उपलब्ध आहे. त्यापैकी ‘‘कौलज्ञाननिर्णय’’ नावांचे एक पुस्तक असून, डॉ. बागची यांनी हे पुस्तक व इतरचार पुस्तके मत्स्येंद्रांनी लिहीलेली म्हणून प्रसिध्दीली आहेत.
जालंधरनाथ
हे मत्स्येंद्रनाथांचे गुरुबंधू होते. यांचा जन्म पंजाबमध्ये झाला. जालंधर नावावरुन तेजालंधरपीठामध्ये उत्पन्न झाले होते किंवा सिध्द होते. हठ-योगवरुन बंधप्रक्रियेमध्ये एक बंध उपलब्ध आहे. यास ‘‘जालंदरबंध’’ असे म्हणतात. तसेच दुसरा एक ‘‘उड्डियानबंध’’ म्हणून जो बंध आहे, त्याच्याशीही जालंधरनाथांचा संबंध होता.
गोरक्षनाथ (१० ते ११ वे शतक)
मत्स्येंद्रनाथांचे प्रमुख शिष्य ‘‘गोरक्षनाथ’’ होते. यांना ज्ञानेशरांनी १८ व्या अध्यायात गौरवाने संबोधिले आहे.
तेणे योगाब्जिनी सरोवरु । विषयविध्वंसैक वीरु ।
तिये पदी कां सर्वेेशरु । अभिषकिले ॥ १८.१७५५ ॥
त्यांनी दिलेल्या परंपरेनुसार म्हणजे मत्स्येंद्रनाथ-गोरक्षनाथ-निवृतिनाथ, याप्रमाणे गोरक्षनाथांचा काल बाराव्या शतकाचा मध्य येतो.
गोरक्षनाथांचे गुरुबंधू म्हणून चर्पटीनाथ, रेवानाथ, चौरंगीनाथ ह्यांची नावे आढळतात वत्यांच्या प्रमुख शिष्यांमध्ये गहिनीनाथ, नागनाथ, भर्तृनाथ, माणिकनाथ व विलेशयनाथ यांचा आढळ होतो. तसेच ज्ञानेûवरांचे पणजे त्र्यंबकपंत यांना गोरक्षांचा उपदेश मिळाला होता.
गोरक्षनाथांचे ग्रंथ
डॉ. हजारीप्रसाद व्दिवेदी यांनी एकूण २८ पुस्तकांचे कर्तेपण गोरक्षनाथांकडे दिले आहे.त्यातील अमनस्क, अमरौधशसनम्, गोरक्षपध्दती, गोरक्षसंहिता, सिध्दीसिध्दान्तपध्दती हे संस्कृत ग्रंथ अधिक महत्वपूर्ण आहेत. हिंदीमध्ये डॉ. बडथ्वाल यांनी ‘‘गोरख बानी’’ या नावाने जो ग्रंथ प्रसिध्द केला आहे. त्यात ४० हिंदी पुस्तकांचा उल्लेख असून त्यातही ‘‘सबदी’’ ‘‘गोरखबोध’’ इ. पुस्तके महत्वाची आहेत.
मराठीतही गोरक्षनाथांच्या नावावर काही ग्रंथ आहेत. त्यापैकी ‘‘अमर-नाथ-संवाद’’, ‘‘गोरक्षगीता’’ हे योगविषयक अनुभवाचे विवरण करणारे ग्रंथ आहेत. यातील ग्रंथाचे, ज्ञानेश्वरीतील व अमृतानुभवातील काही दृष्टांत-प्रमयांशी असणारे साम्य चटकन डोळ्यात भरण्यासारखे आहे.यावरुन हे दोन्ही महापुरुष एकाच पठडीतले असावेत असे वाटू लागते.
गहिनीनाथ
हे गोरखनाथांचे शिष्य व निवृत्तीनाथांचे गुरु होत. ज्ञानेशरांचे आजे गोविंदपंत व आजी निराबाई यांना गहिनी नाथांचा अनुग्रह होता. यांचा संचार महाराष्ट्रात होता ही गोष्टही निर्विवाद आहे व त्याच्या पुष्ट्यर्थ ब्रम्हगिरी पर्वतावरही गोदावरीच्या उगमाजवळ असणाऱ्या त्यांच्या मठाचा नामनिर्देश करता येईल. निवृत्तीनाथांची व गहिनीनाथांची भेट ब्रम्हगिरी पर्वताच्या प्रदक्षणेच्या वाटेवर पडली होती व तेथेच निवृत्तीनाथांना अनुग्रह झाला. निवृत्तीनाथांनी आपल्या एका अभंगात गुरुपरंपरा सांगतांना गहिनीनाथांचे वर्णन केले आहे ते असे…
आदिनाथ उमा बीज प्रगटले । मच्छिंद्रा लाभले सहजस्थिती ॥ तेची प्रेममुद्रा गोरक्षा दिधली
। पूर्ण कृपा केली गहिनीनाथा ॥ वैराग्ये तापला सप्रेमी निवाला । ठेवा जो लाभला शांतीसुख॥ निर्द्वंद्व नि:संग विचरतां मही। सुखानंद हृदयों स्थिरावला ॥ विरक्तीचे पात्र अन्वयाचे सुखदेऊनी सम्यक अनन्यता ॥ निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण । कुळ हे पावन कृष्णनामे ॥
गोरक्षसमकालीन सिध्द :
चर्पटीनाथ – यांनी एका गाण्यात बाह्यचारांवर भर देणारे जे इतर संप्रदाय आहेत, त्यांची व्यर्थता सांगितली आहे. ज्या वेळी काळाची छाया मनुष्यावर पडू लागेल त्यावेळी पांढरे किंवा निळे वस्त्र, लांब जटा किंवा तिलक हे उपयोगी पडणारे नाहीत. कानफाट्यांना ते सांगतात.
इका सेती पटा इक नीलि पटा, इक तिलक जनेऊ लंबी जटा ।
इका फीए इक मानो इक कानिफटा, जब आवैगी कालिघटा ॥
चौरंगीनाथ
हे तिबेटी परंपरेने गोरक्षनाथांचे गुरुबंधू म्हणून मानले गेले आहेत.
‘‘प्राणसंकली’’ नावाचे पुस्तक यांनी लिहीले असावे असे मानतात. सावत्र आईने यांचे हात-पाय कापून यास एका विहीरीत टाकून दिले. पंजाबमध्ये प्रसूत असलेल्या दंतकथेप्रमाणेयांची कथा व पूरन भगताची कथा या एकच होत. ज्ञानेश्वर महाराजांनी या ‘‘भग्नावयवी चौरंगीनाथा’’ स मत्स्येंद्रनाथ सप्तश्रुंगी गडावर भेटले होते. असा उल्लेख केला आहे (अध्याय १८.१७५३)
नागार्जुन
नागार्जुनांच्या बाबतीत निश्चितपणे सांगता येण्यासारख्या गोष्टी म्हणजे (१) नागार्जुन हेरसेश्वर सिध्द होते. (२) गोरखपंथाच्या ‘‘पारसनाची शाखे’’ चे प्रवर्तक नागार्जुन होते व (३)पश्चिम भारतात ते राहत होते. त्यांच्यानंतर होऊन गेलेले योगी लोक त्यांना ‘‘नागाअरजंद’’ असे म्हणत असत. नाथपंथाच्या बारा आचार्यात यांची गणना आहे. यावरील तीन सिध्दांपेक्षा आणखी एकवीस मंडळींची नावे गोरक्ष समकालीन म्हणूनउपलब्ध आहेत. ती येणेप्रमाणे १. चामरीनाथ, २. ततिपा, ३. दारिपा, ४. विरुपा, ५. कामरी, ६. कनखल, ७. मेखल, ८. धोबी, ९. अतिती, १०. चंपक, ११. ढेण्टस, १२. चुणकर, १३. भादे, १४. कामरी, १५. धर्ममापतंग, १६. भद्रवा, १७. सबर, १८. सान्ती, १९. कुमारी, २० सियारी, २१.कमलकगरी.
नाथपंथातील पोटभेद
या पंथामध्ये प्रथम योगाचरणावर फार भर दिला जात असे; परंतु कांही कालानंतर योगचरणाऐवजी बाह्मचारांवर भर देणारी मंडळी जास्त आढळू लागली व ह्या आचारानुसार यानाथपंथाला कांही लहान-मोठे फाटे फुटू लागले. यातील प्रमुख कानफाटे, अवधूत, जोगी इत्यादी नामनिर्देश करता येईल.
१) कानफाटे – नाथपंथाच्या योगमार्गी ओघाला फुटलेला हा एक फाटा आहे. याची संघटना धर्मनाथांनी १४ व्या शतकामध्ये केली आहे. या उपपंथाचे लोक कान विदीर्ण करुन त्यांत कुंडले घालतात. म्हणून त्यांना ‘‘कानफाटे’’ हे नाव मिळाले आहे. ‘‘कानफाटे’’ हे नाव तुच्छतादर्शक म्हणून या योगी लोकांना मुसलमानांनी दिले असेही कांही लोकांचे म्हणणे आहे. या लोकांची बाह्याचिन्हे म्हणजे कानातील मुद्रा (कुंडले), शैली, शृंगी, कंथा, झोळी ही आहेत व ते अंगास भस्मही फासतात. त्याचप्रमाणे अन्नग्रहणाच्या वेळी पुंगी वाजवून ते अन्नग्रहण करतात. कानफाटे गोसावी हे ठिकठिकाणी, निरनिराळ्या प्रांतात भिक्षा मागतांना आढळतात. मुंबई व बेळगाव याकडील कानफाटे आणि काठेवाडा व कच्छ यामधील कानफाटे यांच्यात फरक म्हणजे मुंबई-बेळगांवकडील कानफाटे हातात भिक्षेच्या वेळी एक त्रिशूळ घेतात. जेकानफाटे हातात डौर, म्हणजे डमरू बाळगतात; त्यांनी ‘‘डौरी गोसावी’’ असे म्हणत.यांच्यामध्ये ‘‘ह्ठयोग-प्रदीपिका’’ या गं्रथास फार महत्व आहे.
ज्ञानेश्वरानंतरच्या संतमंडळीतही या कानफाटे पंथाबद्दल सहानुभूती उरलेली दिसत नाही. तुकारामांनी तर आपल्या परखड बोलीत त्याचा स्पष्टच निषेध केला आहे.
कान फाडुनिया मुद्रा ते घालिती । नाथ म्हणवितो जगामाजी ॥
घालोनिया फेरा मागाती द्रव्यासी । परी शंकरासी नोळखिली ॥
पोट भरावया शिकतो उपाय । तुका म्हणे जाय नरकलोका ॥
सारांश, कानफाटे पंथ हा मूळ शुध्द योगमार्गी नाथपंथास फुटलेला एक फाटा असून, बाह्यचारांवर भर देणारा आहे.
२) अवधूत – हा देखील मूळ नाथपंथास फुटलेला दुसरा एक फाटा आहे. या संप्रदायाचेलोक जितकी कमी वस्त्रे वापरता येतील जितकी कमी वापरतात. उघड्या अंगांना मातीफासतात व जटा वाढवितात. गोरक्षनाथांना ते आपले गुरु मानतात. ‘‘गोरखबोध’’ व ‘‘गोरखनाथकी गोष्टी’’ या ग्रंथातून गोरखनाथांना अवधूत हे उपपद लावलेले आढळून येते. ‘‘अवधूत या शब्दाचा अर्थ’’ ‘‘जात गोत फेकून दिलेला पुरुष ’’ असा आहे.
३) जोगी – हे लोक हिंदूस्थानात सर्व देशात, प्रदेशात आढळतात. हे लोक मठ करुनराहतात. तर कांही फिरस्तीवर असतात. ते स्वत:ला नाथ म्हणून शिवाचा अवतार जो ‘‘गोरक्षनाथ’’ त्याचे आपण वंशज आहोत असे म्हणवतात. जोगी पुरुषांच्या गळ्यात पितळेची, तांब्याची किंवा चांदीची पुंगी असते तिला सिंगी म्हणतात.
नाथसंप्रदायाची पवित्र स्थाने
उत्तरेस नेपाळ – काश्मिरपासून दक्षिणेस रामेश्वरापर्यंत ही स्थाने व मठ मंदिरे विखुरलेलीआहेत. त्यातील त्र्यंबक मठ (नाशिक), पांडुधूनी (मुंबई), बत्तीसशिराळे (सांगली), पैठण(औरंगाबाद), गंभीर मठ (पुणे), वृध्देश्वर (नगर), आळंदीजवळील डुडूळगाव येथील अडबंगनाथमंदिर (पुणे), केंन्दूर (पुणे) व सासवड जवळील दिवे घाट (पुणे) इ. ठिकाणे या अस्तित्वाच्या खुणा दर्शविणारी आहेत.
अशा रीतीने उत्तर हिंदुस्थानात उगम पावून दक्षिणेकडे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणादिभागात संचार करुन पुन:श्च उत्तर हिंदुस्थानात स्थिरावलेला हा नाथसंप्रदाय दक्षिणेत का रुजूशकला नाही ? याची प्रमुख एकदोन कारणे सांगता येतील. पहिले म्हणजे यानाथसंप्रदायातबाह्यचारांवर पुढे पुढे भर दिला गेल्यामुळे मूळ शुध्द योगाभ्यासाचा अनुभव व बोध मागे पडून सांप्रदायिकांमध्ये विकृती उत्पन्न झाली आणि दुसरे या पंथाचा प्रवाह दक्षिणेत झुळू झुळू वाहूलागतो तोच त्यास ‘‘वारकरी पंथा’’च्या प्रवाहात श्री संत ज्ञानेश्वरांच्यामुळे विलीन व्हावे लागले.
(२) महानुभवी संप्रदाय :-
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या आगोदरचा मोठा संप्रदाय. हा संप्रदाय श्री दत्तात्रेयालाचप्रमुख देवता, आराध्य दैवत मानतो. हा संप्रदाय श्री दत्त संप्रदायच आहे. या संप्रदायाची गुरुपरंपरा श्री दत्तात्रेय – चांगदेव राऊळ – गुंडम राऊळ – चक्रधर अशी आहे. या महानुभवीसंप्रदायाचा श्रीदत्त एकमुखी, चतुर्भुज आहे. श्री दत्तात्रेय नेहमी नाना वेष, रूप धारण करुन सिध्द लोकांना दर्शन देतात, त्यांची वाणी अमृतवर्षिणी आहे. सर्व युगात त्यांचा अखंड संचार चालू आहे. माहूरगड, पांचाळेश्वर, फलटण ही या संप्रदायाची मुख्य तीर्थक्षेत्रे आहेत तर श्री. चक्रधरस्वामींनी लिहलेला ‘‘लिळाचरित्र’’ हा मुख्य ग्रंथ आहे. प्रचीन काळात श्री नाथ संप्रदाय व श्री महानुभव संप्रदायाचे प्राबल्य सर्व भारतभर होते.महानुभव संप्रदाया बरोबरच श्री दत्त संप्रदायाचा प्रसार / प्रचार / श्री दत्त उपासना महानुभवसंप्रदायाने भारतभर वाढविली. कांहीच्या मते आयुष्यात काही ना काही गमावल्या नंतर बाकीउरतो तो अनुभव आणि अशा सर्व थोरा मोठ्यांचा मिळून जो महान अनुभव मिळतो तो मिळण्याचा मार्ग महानुभव पंथातून शिकायला मिळतो. तेराव्या शतकात महाराष्ट्र यादवांच्या राजवटी खाली स्वराज्याचे सुख भोगीत होता. हे राजघराणे धर्म अभिमानी असून, हेमाद्रीसारख्याधर्म पंडितांच्या मार्गदर्शनाने चालणारे होते. नाना प्रकाराची देव-दैवते, व्रतवैकल्ये, मंत्रस्त्रोत्र इत्यादीचा सुकाळ होवून सर्वत्र सकाम भक्तीचे बंड, वारे माजले होते. त्यातच महाराष्ट्रातउदयाला आलेला महानुभव पंथ हा एक हिंदू धर्मांतर्गत संप्रदाय असून त्याचा प्रसार एकेकाळी काबूल – कंदाहार पर्यंत झाला होता.
महानुभव पंथ महाराष्ट्रात याच नावाने परिचित असलातरी, त्याला महात्मा पंथ, अच्युत पंथ, जयकृष्णी पंथ, भटमार्ग, परमार्ग या नावाने सुध्दा ओळखले जाते. सृष्टीमध्ये परमेश्वराशिवाय दुसरा कोणीच उध्दार करु शकत नाही. हा सिध्दांतया पंथाचा मूळ पाया असून, सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी या पंथाचे संस्थापक आहेत.महाराष्ट्राचा स्वाभिमान धारण करणारा, मराठी भाषेचा कैवार घेणारा आद्य संप्रदाय म्हणजे हा महानुभव पंथ. मराठी साहित्याचं अपूर्व लेणं या पंथाने साकारले आहे. मराठी भाषेलासर्वतोमुखी, सर्वतोपरी शृंगारित करण्याचे कार्य या पंथाने केले आहे. श्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्र भूमीचा केलेला गौरव व मराठीचा धरलेला आग्रहएकमेवाद्वितीय असा आहे. महाराष्ट्राचा भूगोल सांगणारा, मराठीचा इतिहास रचणारा हा पंथ खऱ्या अर्थाने राजधर्म आहे.त्याकाळी लोकव्यवहाराच्या भाषेत कुठलंही ज्ञान उपलब्ध नसणे व ज्ञानाची भाषा संस्कृत असणे ही मुख्य अडचण सर्वसामान्यांना यायची. या सर्व मर्यादा, अतिक्रमण, सर्वसामान्यांनालोकव्यवहाराच्या मराठी भाषेत निर्भीडपणे ज्ञान श्री चक्रधरांनी लोकांना वाटले. स्त्री शूद्रादिंना ज्ञानांची दारे उघडून दिली. संस्कृतच्या प्रचंड दडपणाखाली वावरणाऱ्या ज्ञानाला श्री चक्रधरांनी मराठी भाषेचा लगाम लावला. महानुभव संप्रदायाचा मूळ गं्रथ लीळाचरित्र हा मराठी सारस्वताचे अलौकिक लेणे आहे, अनमोल ठेवा आहे. लीळाचरित्र हा मराठी भाषेतील आद्य ग्रंथ आहे. या ग्रंथाला ‘‘सातैरुपचरित्रे’’ ‘‘असेही म्हणतात. या चरित्रात श्री चक्रधर स्वामींच्या उत्तरार्ध, पूवार्ध, अज्ञात चरित्रबरोबरच सह्याद्रीच्या लीळा (श्री दत्तात्रय चरित्रे), कापारीच्या लीळा (श्रीकृष्ण चरित्रे), द्वारावतीच्या लीळा (श्री चक्रपाणी चरित्रे), रिध्दपुरच्या लीळा (श्री गोविंदप्रभू चरित्रे) यांचा समावेश आहे. बाराव्या शतकात जीवांच्या उध्दारासाठी रिध्दपूरला जावून, राजवैभवाचा त्यागकरुन परमेश्वर अवतार श्री गोविंदप्रभू यांच्याकडून ज्ञानशक्तीचा स्वीकार चक्रधरांनी केला. यापंथातील पंचकृष्ण अवतारापैकी श्री चक्रधर स्वामी पाचवे ईश्वर अवतार होय.
बाराव्या शतकात यादवांची राजवट चालू होती. तत्कालीन धार्मिक परिस्थितीचा विचार करता चार्तुवर्ण्याच्या वर्चस्वामुळे समाज आतून खिळखिळा झाला होता. धर्म तत्वज्ञान हे संस्कृत भाषेच्या कडी-कुलूपात बंद होते. अशा परिस्थितीत श्री चक्रधर स्वामींनी या महानुभवपंथाची स्थापना केली. अस्पृशता निवारण, मराठी भाषेचा पुरस्कार, ज्ञानभक्तीने परमेश्वर प्राप्ती. ईश्वरतत्वाची प्रचिती, विषमतेवर प्रहार, शांतीचा संदेश हे मुख्य कार्य श्री चक्रधर स्वामींनी मुख्यत: जनसामान्यात केले. तसेच सर्व वर्गाकरीता उपदेशाची द्वारे खुली केली. मराठीला धर्म भाषेचे अधिष्ठान मिळवून दिले.